उरण रेल्वे स्टेशनमध्ये पावसाचे पाणी

| उरण | वार्ताहर |

नवी मुंबई खारकोपर ते उरण ही बहुप्रतिक्षित लोकल सुरू होण्यापूर्वीच उरणच्या रेल्वे स्टेशनमधील भूमिगत मार्गावर पावसाचे पाणी शिरल्याची घटना घडली आहे. त्यामुळे ही लोकल रेल्वे सुरू होण्यापूर्वीच या मार्गावरील कामांची पोलखोल झाली आहे. रेल्वेच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या उरण काही तरुणांनी स्थानकात साचलेल्या या पाण्यात डुंबून आनंद घेतला आहे.

उरण लोकल सुरू होण्याची येथील नागरीक गेली 50 वर्ष वाट पाहत आहेत. त्यातच रेल्वे प्रशासनाकडून सुसज्ज रेल्वे स्टेशन उभारल्याने लोकल रेल्वेची सेवा सुरु करण्यासाठी तारीख पे तारीखही जाहीर झाल्या आहेत. त्यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते लवकरात लवकर नवी मुंबई शहराला जोडणारी उरणची रेल्वे सेवा सुरु करण्यात येणार अशा प्रकारची चर्चा जनमाणसात वर्तविण्यात येत असताना पहिल्याच पावसात नव्याने उभारण्यात आलेल्या उरणच्या रेल्वे स्टेशनमधिल अंडरग्राऊंडमध्ये चार ते पाच फूट पाणी साचल्याने पावसाळ्यात या स्टेशनची स्थिती काय असणार, याचे भविष्यच दिसू लागले आहे. एकंदरी गेली 50 वर्षे रेल्वे सेवेच्या प्रतिक्षेत असणाऱ्या उरणकराच्या स्वप्नावर रेल्वे प्रशासनाने पाणी शिंपडण्याचे पाप पैशाच्या हव्यासापोटी केले आहे, हे मात्र खरे आहे.

दोन्ही स्टेशन अंधारात
त्यातच पावसाळ्याला सुरुवात झाल्या पासून मागील आठवडा पासून उरण व द्रोणागिरी ही दोन्ही स्थानके अंधारात आहेत. या संदर्भात रेल्वे विभागाशी संपर्क साधला असता या दोन्ही स्थानकांच्या विजेच्या चाचण्या सुरू असून लवकरच वीज पुरवठा पुरवत होईल. तसेच, रेल्वे स्टेशन मधिल अंडरग्राऊंड मधिल साचणारे पावसाचे पाणी लवकरच काढण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येत आहे.

Exit mobile version