पावसाचा विमान, रेल्वे सेवेला फटका

। मुंबई | प्रतिनिधी |

मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून लोकल आणि रेल्वे उशिराने धावत आहेत. याचा फटका विमान वाहतुकीलादेखील बसला आहे. मुंबईहून इतर ठिकाणी जाणार्‍या अनेक फ्लाईट रद्द करण्यात आल्या किंवा त्यांची वेळ पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे विमान प्रवाशांना देखील पावसाची झळ बसल्याचे दिसून आले. डेक्कन क्विन, प्रगती, सिंहगड या पुण्यातून येणार्‍या रेल्वे रद्द करण्यात आल्या. त्यामुळे एक्स्प्रेसच्या प्रवाशांनी बस स्टँडवर गर्दी केली होती.

Exit mobile version