राज्यात पुन्हा पावसाळी हवा

| मुंबई | वृत्तसंस्था ।

दोन दिवस राज्याच्या विविध भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. तर काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मुंबईसह कोकणातील चार जिल्हे, विदर्भातील बुलढाणा ते गोंदिया, वाशिम ते गडचिरोली अशा 11 जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी दोन दिवसांत पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक, कोल्हापूर सांगली आणि सोलापूरपर्यंत अशा 11 जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यताही व्यक्त केली आहे.

Exit mobile version