रानसई धरणाच्या पाण्याची पातळीत वाढ

उरण | वार्ताहर |
उरणमध्ये पडणार्‍या मुसळधार पावसामुळे रानसई धरणाच्या पाण्याची पातळी वाढली आहे. पावसाचा असाच जोर कायम राहिला तर जुलैच्या पहिल्याच आठवड्यात रानसई धरण भरून वाहू लागेल असा विश्‍वास एमआयडीसीचे उरण कार्यालयाचे उपअभियंता आर. डी. बिरंजे यांनी दिली.

कडक उन्हामुळे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आठवड्यातून मंगळवार व शुक्रवार या दोन दिवशी पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु पावसाने जोरदार सुरुवात केल्याने पाणी टंचाईची समस्या दूर झाली आहे.

या वर्षी जून महिन्यातच पावसाने झोडपून काढले आहे. गेली 4 ते 5 दिवस पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणाच्या पाण्याच्या साठ्यात वाढ झाली आहे. रानसई धरणाची उंची 116 फूट असून पडणार्‍या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या साठ्यात वाढ होऊन सध्या धरणात पाण्याचा साठा 93 फूट झाली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर जुलैच्या पहिल्याच आठवड्यात रानसई धरण भरून वाहू लागेल असा विश्‍वास एमआयडीसी उरण कार्यालयाचे उपअभियंता आर. डी. बिरंजे यांनी दिली. सतत पडणार्‍या पावसामुळे उरणकरांवरील येऊ घातलेले पाणी टंचाईचे संकट मात्र या निमित्ताने दूर झाले आहे.

Exit mobile version