जखमी अधिकारी पिंपळेंची राज ठाकरेंकडून विचारपूस

ठाणे | प्रतिनिधी |
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात ठाणे मनपा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची भेट घेतली. फेरीवाल्याच्या हल्ल्यात ठाणे मनपा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या गंभीर जखमी झाल्यात. कालच माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी ठाण्यात जाऊन कल्पिता पिंपळे यांची भेट घेतली. दरम्यान, फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई सुरु असताना एका फेरीवाल्यानं कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला केला. याच हल्ल्यात कल्पिता पिंपळे गंभीर जखमी झाल्या. एवढंच नाहीतर त्यांना आपल्या हाताची बोटं गमवावी लागली.

Exit mobile version