राज्यस्तरीय मुख्याधिकारी संघटनेचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
। कर्जत । वार्ताहर ।
ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे व त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर 30 ऑगस्ट रोजी झालेल्या जीवघेण्या हल्ल्या प्रकरणी कोकण विभागीय संघटनेच्यावतीने रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना निवेदन सादर करण्यात आले.
महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे व त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे हे अतिक्रमण विरोधी पथक घेऊन अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करत असताना तेथील मुजोर फेरीवाले अमरजीत यादव यांनी त्यांच्यावर व त्यांच्या अंगरक्षक यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला करून दोघांना गंभीर दुखापत केली, हा प्रकार अतिशय गंभीर असून निंदनीय आहे,कर्तव्य बजावत असताना झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ, नियम कायदे मोडणार्या नी केलेल्या कृत्याचा जाहीर निषेध म्हणून तसेच गुन्हेगारांना शिक्षा व्हावी यासाठी राज्यस्थरीय मुख्याधिकारी संघटनेचे कोकण विभागीय संघटक डॉ. पंकज पाटील आणि रायगड जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा, नगरपंचायती मुख्याधिकारी यांनी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना निवेदन सादर केले.