| पनवेल | प्रतिनिधी |
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील सत्तासंघर्षाचा संदर्भात मी लवकरच बोलणार असल्याचं जाहीर केलं आहे. याबाबतची वेळही राज ठाकरे यांनी सांगून टाकली आहे. राज ठाकरे हे गुढीपाडव्याला होणार्या मेळाव्यात महाराष्ट्रातील सत्तांतर आणि सत्तासंघर्षावर बोलणार असल्याचं त्यांनी स्वतः जाहीर केलं आहे. सोमवारी महाराष्ट्रामध्ये मराठी राज भाषा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. मनसेच्या वतिने पनवेलमध्ये या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज ठाकरे बोलत होते.
यावेळी राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली त्यावेळी मुलाखतीच्या दरम्यान राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यावर भाष्य करत असतांना महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी मला आत्ता कुठलाही ट्रेलर दाखवायचा नाही, मी डायरेक्ट पिक्चर दाखवणार असल्याचेही राज ठाकरे यांनी म्हंटलं आहे.
पनवेल येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतिने राजभाषा दिनाचं आयोजन करण्यात आले आहे. गेल्या चार दिवसापासून हा कार्यक्रम सुरू असून त्यामध्ये आज राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली आहे. अनेक प्रश्न विचारण्यात आले त्यात राज ठाकरे यांनी मार्मिक उत्तरे दिले आहे.





