राजाभाऊ ठाकूर समन्वयक पदी

। अलिबाग । प्रतिनिधी ।

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच राजकिय पक्षाकडून जोरदार प्रचार सुरू आहे. विशिष्ट नेत्यांकडे महत्वाची जबाबदारी दिली जात आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांच्याकडे रायगड लोकसभा मतदार संघाच्या समनव्यक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांची नियुक्ती करीत पत्र दिले.

गेली 20 वर्षाहून अधिक काळ राजाभाऊ ठाकूर राजकारणात सक्रीय आहेत. दिवगंत माजी आ. मधुकर ठाकूर यांच्याकडून त्यांना राजकीय धडे मिळाले आहेत. नियोजनबध्द कामामुळे त्यांची मध्यप्रदेशच्या निवडणूकीत त्यांना निरीक्षक म्हणून जबाबदारी दिली होती. त्याच नुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजाभाऊ ठाकूर यांची समनव्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना विजयी करण्यासाठी योग्य ते नियोजन करावे असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रातून सूचित केले आहे. राजाभाऊ ठाकूर यांची समन्वयक म्हणून निवड केल्याबद्दल त्यांनी काँग्रेसचे केंद्रीय अध्यक्ष खरगे,काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांचे आभार व्यक्त केले.

माझे वडील स्व. मधूकर ठाकूर यांच्या आशीर्वादाने राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. पक्षाच्या वरिष्ठांना आजवर सोपवलेली प्रत्येक जबाबदारी यशस्वी पार पाडली आहे. समन्वयक म्हणून दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडेन.

राजाभाऊ ठाकूर
वरिष्ठ उपाध्यक्ष, काँग्रेस रायगड जिल्हा
Exit mobile version