पनवेल मनपा निवडणुकीत राजे प्रतिष्ठान उतरणार

I पनवेल I प्रतिनिधी I
राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ जितुकाका यांची सातारा येथे भेट घेऊन आगामी पनवेल महानगरपालिकेत राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे उमेदवार उभे करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली.

यावेळी जितुकाका यांनी आपण बिनधास्तपणे उमेदवार उभे करा, त्यासाठी जी काही मदत लागेल, ती आम्ही करू व पूर्ण भक्कमपणे उमेदवारांच्या पाठीशी उभे राहू, असे आश्‍वासन दिले. महाराष्ट्र संघटक प्रमुख अशोक शिगवण अच्चूभाई, महाराष्ट्र उपाध्यक्ष नारायण कोळी, कार्याध्यक्ष प्रकाश कोळी यांच्या मार्गदर्शनाने व महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीरभाई कुरेशी, महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांच्या नेतृत्वात आगामी पनवेल महानगर पालिका निवडणुकांमध्ये राजे प्रतिष्ठान कामगार सेना आपले 30 उमेदवार विविध विभागात उभे करणार असल्याचे उपाध्यक्ष बशीरभाई कुरेशी, सहचिटणीस केवल महाडिक यांनी स्पष्ट केले आहे.

Exit mobile version