| पाली/गोमाशी । वार्ताहर ।
राजेंद्र खैरे यांनी नांदगाव विद्यालयातील इयत्ता सातवीमधील विद्यार्थी दत्तक घेऊन त्याचे 12 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. प्रज्वल जयेश दिघे हा विद्यार्थी दिघेवाडी गावातील असून त्याची आर्थिक परिस्थिती खूप बेताची आहे. त्यात त्याचे मातृछत्र हरपलेले आहे. त्याचे वडील मोल मजुरी करून आपल्या कुटूंबाचे उदरनिर्वाह करीत आहेत त्यामुळे त्याच्या मुलांचे शिक्षण घेण्यात अडसर निर्माण होत आहे. असा उपक्रम तालुक्यात यांनी प्रथमच राबविला असावा. त्यानी घेतलेल्या या विधायक निर्णयाचे नांदगाव विद्यालयातील प्राचार्य आणि शिक्षक वृंद तसेच संस्थेचे अध्यक्ष सुरेश खैरे यांनी विशेष कौतुक केले आहे.
आपल्या उत्पन्नातील काही भाग या गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च होत आहे याचे मला खूप समाधान वाटत आहे.
– राजेंद्र साधुराम खैरे