| सुतारवाडी | प्रतिनिधी |
कोलाड येथील राजेंद्र रामचंद्र वाचकवडे यांचे वयाच्या 42व्या वर्षी निधन झाले. निधनाची बातमी समजताच कोलाड नाक्यावरील दुकान बंद ठेवण्यात आली. व्यापारी, शिक्षक, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, नातेवाईक, तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने अंतयात्रेस सहभागी झाले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, चुलते असा परिवार आहे. दशक्रिया विधी सोमवारी (दि.22) कोलाड येथील नदीवर तर उत्तर कार्य बुधवारी (दि.24) त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याचे ज्येष्ठ बंधू महेंद्र वाचकवडे यांनी सांगितले.







