रोहा कृषी उत्पन्न बाजार सभापतीपदी शेकापचे राजेश सानप

| रोहा | प्रतिनिधी |

रोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत यापूर्वीच शेतकरी कामगार पक्षाने 12, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 6 जागा बिनविरोध झाल्याने महाविकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले होते. बुधवारी झालेल्या सभापतीपदाच्या निवडणुकीत शेकापचे राजेश नामदेव सानप, तर उपसभापतीपदावर जयंत अनंत वाघ यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी टी.एच. लाटणे यांनी जाहीर केले. नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचे अभिनंदन करण्यासाठी शेकाप नेते माजी आ. पंडित पाटील आवर्जून उपस्थित होते.

याप्रसंगी ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर, महादेव मोहिते, अनंत वाघ, शिवराम महाबळे, मनोहर महाबळे, माजी सभापती गणपत म्हात्रे, माजी उपसभापती पांडुरंग ठाकूर, मजूर फेडरेशन चेअरमन हेमंत ठाकूर, जिल्हा बँक संचालक गणेश मढवी, विद्यमान संचालक कांचन माळी, सपना मोहिते, मनिषा घोगरे, विनायक धामणे, राम गिजे, काशिनाथ भोईर, अनिल तवटे, रघुनाथ ठाकूर, विशाल म्हात्रे, चंद्रकांत झोरे, महेंद्र पोटफोडे, आतिष मोरे, विलास गुजर, अनिल काळे, नरेश वाघमारे, ज्ञानेश्वर साळुंखे, चंद्रकांत पार्टे यांच्यासह रोहा तालुक्यातील शेकापचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भविष्यात बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी हिताचे निर्णय घेणार असल्याचे नवनिर्वाचित सभापती यांनी सांगितले आहे.

Exit mobile version