राजेश ठाकूर यांचे अपघाती निधन

। चिरनेर । वार्ताहर ।
भारत पेट्रोलियम कामगारांचे राष्ट्रीय नेते कॉम्रेड राजेश ठाकूर (57) यांचे गुरुवारी रात्री मोटार वाहन अपघात निधन झाले. त्यांच्यावर भेंडखळ या जन्मगावी शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे दोन मुले व पत्नी असा परिवार आहे. यावेळी कामगार क्षेत्रातील नेते व कामगार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जेएनपीटीचे कामगार विश्‍वस्त भूषण पाटील, कामगार नेते व क्रांतिकारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रमेश ठाकूर, अ‍ॅड.प्रमोद ठाकूर, अ‍ॅड.विजय पाटील, काँग्रेस नेते राम भगत, बीपीसीएलचे कामगार नेते किरीट पाटील, एम.डी.ठाकूर, अनंत घरत, प्रवीण पाटील, जयवंत पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली.

Exit mobile version