| महाड | वार्ताहार |
ऐतिहासिक किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे राजमाता जिजाऊ यांचा 425 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळी विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी आ. भरत गोगावले, तहसीलदार शितोळे, सीमा बेंदुगडे, विजय कदम, बाळ राऊळ, मनोज काळीजकर, रघुवीर देशमुख, सिराज सय्यद, राजेंद्र खातू, संतोष गायकवाड, देविदास गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आ. गोगावले यांनी राजमाता जिजाऊ या आपल्या प्रेरणा असून त्यांचे विचार आणि कार्य चिरकाल टिकणारे आहेत असे सांगून पाचाड परिसरातील प्रलंबित कामे लवकरच पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत अशी ग्वाही दिली.
पाचाड येथे राजमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा
