। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावरील झालेल्या दिल्लीत झालेल्या परेडमध्ये ’पॉप्युलर चॉईस’ प्रकारात महाराष्ट्राच्या चित्ररथाचा प्रथम क्रमांक आला आहे. तर लष्करी तुकड्यांमध्ये सीआयएसएफला सीएपीएफमधील सर्वोत्तम परेड करणारी तुकडी म्हणून पुरस्कार मिळाला आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर महाराष्ट्रातील जैवविविधतेवर आधारित चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जैवविविधतेचे दर्शन संपूर्ण भारतवासीयांना घडून आले.