राजू शेट्टींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

| मुंबई | वृत्तसंस्था |

शेतकरी स्वाभीमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांची मंगळवारी भेट घेतली. ही भेट राजकीय नव्हती, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांची अदानी उद्योग समुहाशी जी लढाली सुरु आहे त्या अदानी समुहाचा शेतकऱ्यांना देखील त्रास होत असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.

केंद्र सरकारेन अदानी समुहावरील प्रेमापोटी खाद्यतेलावरील आयात शुल्क 5 टक्के कमी केल्यामुळे सोयाबीनला दर नाही. 2000 साली सोयाबीनचा दर 4 हजार रुपये होता. 24 वर्षानंतर या दरात काहीच फरक पडलेला नाही. कारण मोठ्या प्रमाणात कच्चे तेल बाहेरच्या देशातून आयात झाल्यामुळे सोयाबीनला दर नाही, असे राजू शेट्टी म्हणाले.

येत्या 15 जानेवारीपासून सोयाबीन आणि कर्जमाफीच्या मुद्यावर मराठवाड्यात दौरा सुरु करणार आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाची अदानीविरुद्धची लढाई आहे. ती शेतकऱ्यांची देखील लढाई आहे. कारण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. कोल्हापूरमधील वेदगंगा नदीवरील पाटगाव येथील धरणाचं पाणी आहे. त्या धरणाचं पाणी अदानी उद्योगसमूह 8400 कोटी रुपये खर्च करुन सिंधुदुर्गला नेऊन 2100 मेगावॅटची वीज निर्मिती करणार आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि सीमाभागातील शेतकऱ्यांना पाणी कमी पडणार आहे. याविरोधात आम्ही लढा लढणार आहोत. यासाठी आम्ही संघर्ष समिती उभी करणार आहे. यामध्ये कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमधील शेतकऱ्यांचा समावेश असेल, असे शेट्टी म्हणाले.

Exit mobile version