खालापूर-कर्जत-सुधागड तालुका चँम्पियन ट्राँफीचा राजवाडा पोसरी संघ अंतिम विजेता

। खोपोली । प्रतिनिधी ।
खालापूर-कर्जत-सुधागड क्रिकेट खेळाडूंना एकत्र आणण्यासाठी खालापूर टेनिस असोसिएशनच्या पुढाकारातून भव्य दिव्य चँम्पियन ट्राँफीचे आयोजन करित झालेल्या अटीतटीच्या लढतीत 2021 च्या स्पर्धेत राजवाडा पोसरी संघाने कडवी झुंज देत विजय संपादन केले तर उपविजेता संघ ठरला खालापूर संघ. तीन तालुक्यातील जवळपास 24 संघ निर्माण करुन चँम्पियन ट्राँफीचे आयोजन करीत खेळाडूनंमध्ये रणसंग्राम लावले असता या अटीतटीच्या लढतीत विजेता ठरला राजवाडा पोसरी संघ असून उपविजेता गेम चेंजर खालापूर संघ ठरला. तर तिसर्‍या क्रमांकाचा मानकरी शिवराज वाँरियर्स संघ, चौथा क्रमांकाचा मानकरी देवांश इलेव्हन संघ, पाचव्या क्रमांकाचा मानकरी श्राव्या इंटरप्रायजेस, सहाव्या क्रमांकाचा मानकरी आरोही दक्ष इलेव्हन वडगाव ठरल्याने या सर्व विजयी संघाना रोख रक्कम व भव्य ट्राँफी देऊन गौरविण्यात आले.


क्रिकेट खेळाकडे तरुणांचा वाढत ओघ पाहता प्रत्येक ठिकाणी क्रिकेट प्रिमियर लीग आयोजन केले जात असताना संजय (इक्कू) सोळंकी, केतन मुंढे, दिंगबर मोरे, गौरव घोसाळकर, शुभम घोंडविदे, कल्पेश जाधव या मित्रांनी खालापूर-कर्जत-सुधागड तालुका चँम्पियन ट्राँफीचा आयोजन चिंचवली येथे केले होते. बक्षीस वितरण नरेश पाटील, नगराध्यक्षा सुमन औसरमल, अमोल जाधव,मोहन औसरमल,विकी गायकवाड, विजू हांगे, राजेंद्र पेढे, विनायक तेलवणे, मंगेश मोरे, प्रशांत खांडेकर, नाना पाटील, संतोष चौधरी, चंद्रप्पा आनिवार, विनोद सोळंकी, उदय कोळबे, नामदेव मोरे, संतोष म्हामूणकर आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने क्रिडा रसिक व खेळाडू उपस्थित होते.

Exit mobile version