राज्यसभेचं कामकाज स्थगित

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था ।

विरोधकांच्या जोरदार घोषणाबाजी आणि गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज सोमवारी, 3 ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आले. विरोधी पक्षाच्या खासदारांनी नियम 267 अंतर्गत चर्चेची मागणी करत सभापतींच्या आसनाजवळ येऊन घोषणाबाजी केली. सभापती सी.पी. राधाकृष्णन यांनी विरोधकांची मागणी फेटाळल्यानंतर गोंधळ आणखी वाढला. या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे कामकाज सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी विरोधकांच्या गोंधळावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

Exit mobile version