म्हसळ्यात पोलिसांना बांधली राखी

। म्हसळा । वाार्ताहर ।
सैनिक आणि पोलिसांना आपण घरातच आहोत असे वाटावे, त्यांच्या प्रती प्रेम व्यक्त करुन त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सोनल घोले, शहर अध्यक्षा शगुप्ता जहांगीर, युवती अध्यक्षा वृषाली घोसाळकर, सरपंच वनिता खोत यांनी रक्षाबंधनाचे औचित्य साधून म्हसळा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी बंधूंना राखी बांधून शुभेछा दिल्या.

Exit mobile version