। उरण । वार्ताहर ।
रक्षाबंधन निमित्ताने उरण बाजार पेठेत राखी खरेदीसाठी बहिणीची लगबग सुरू झाली आहे. या सणानिमित्त बाजारात वेगवेगळ्या आकर्षक अशा कलाकुसर असलेल्या राख्या विक्री साठी आल्या आहेत. राख्यांमध्ये मोती, जरी व जरदोरीच्या राख्या अत्यंत साध्या आणि सुंदर असल्यामुळे त्यांना देखील अधिक मागणी आहे, असे येथील राखी विक्रेत्यांनी सांगितले. यावर्षी राखी बाजार थोडा चांगल्या प्रमाणात आहे. लहान मुलांमध्ये तिरंगा आणि कार्टूनच्या राख्या जास्त पसंद केल्या जात आहेत आणि त्याच बरोबर स्टोन, कुंदन वर्क, कलर्ड, घुंगरू, लाख, मिरर वर्क असलेल्या राख्या ग्राहकांचे अधिक लक्ष वेधून त्याच बरोबर लहान मुलांसाठी छोटा भीम, मोटू पतलू स्पायडरमॅन, डोरेमॉन व किड्स टॉय अश्या राख्यांची मागणी अधिक आहे. दरवर्षी प्रमाणे राख्यांवर नाव आणि संदेश लिहलेल्या राख्यांची मागणी सुद्धा आहे.असे श्रावणी समेळ यांनी सांगितले.