मतदार संघात चिऊताईंची हवा

रोह्यात प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

। रोहा । वार्ताहर ।

अलिबाग-मुरुड-रोहा विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडी पुरस्कृत शेकाप उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांनी रोहे ग्रामीण भागात रॅली काढून तसेच घरोघरी गाठीभेटी घेऊन प्रचारात आघाडी घेतली आहे. प्रचारादरम्यान गावागावात चित्रलेखा पाटील यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून संपूर्ण मतदार संघात चिऊताईंची हवा असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

तालुक्यातील पारंगखार, कोकबन, न्हावे, खांबेरे, चणेरा, सारसोली, खैरे खुर्द, म्हाळुंगे, धोंडखार तर्फे बिरवाडी, कुंभोशी, आरे खुर्द, आरे बुद्रुक, खारगाव, झोलांबे, भातसई, शेणवई, सानेगाव, यशवंतखार तसेच संपूर्ण पश्‍चिम खोर्‍यात महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्या प्रचार रॅली, गावं बैठका, कॉर्नर सभांना उदंड प्रतिसाद मिळत आहे. ज्येष्ठ नेते पाखर अण्णा, खांडेकर, सरपंच राजेंद्र मळेकर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांची प्रचार रॅली काढण्यात आली. या प्रचार रॅलीला स्थानिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

तब्ब्ल 5 वर्षानंतर आमच्या समस्या ऐकून, समजून व जाणून घेऊन ते मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले जात असल्यामुळे यंदा आम्हाला बदल हवा आहे, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. तसेच, चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताईला बहुमताने निवडून देणार, असे आश्‍वासनदेखील स्थानिकांनी दिले आहे.

यावेळी सरपंच राजेंद्र एकनाथ मळेकर, तुकाराम पाखर, प्रसन्न शिंदे, सुहास शिंदे, विकास पाखर, सीताराम घाग, दिनेश पोंगडे, मिलिंद पवार, महेश वरवते, धनेश पोंगडे, सदस्या पायल मळेकर आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version