चिरनेरला रामनवमीचा उत्सव

। चिरनेर । प्रतिनिधी ।

उरण तालुक्यातील चिरनेरमधील पाडा व तेलीपाडा ग्रामस्थांच्यावतीने सालाबादप्रमाणे दि.16 ते 18 एप्रिल या कालावधी दरम्यान श्री रामनवमी जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवारी (दि.16) बाल कीर्तनकार आश्‍लेषा अजित केणी हिचे कीर्तन होणार आहे. यावेळी सद्गुरु माऊली हसूराम बाबा यांचे शिष्यगण हरिपाठ सादर करतील. बुधवारी (दि.17) मुख्य दिवशी सकाळी प्रभू श्री रामचंद्रांचा अभिषेक होईल. त्यानंतर चिरनेर येथील श्री राम प्रासादिक भजन मंडळाच्यावतीने भजनाचा कार्यक्रम सादर होईल. दरम्यान, सकाळी दहा ते बारा या कालावधीत प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्माचे किर्तन, दुपारी तीन वाजता खोपटे येथील कुलस्वामिनी संगीत साज भजन मंडळ यांच्या भजनाचा कार्यक्रम व रात्री प्रभू श्री रामचंद्रांची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. गुरुवारी (दि.18) रात्री दहा वाजता प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत.

Exit mobile version