। चिरनेर । वार्ताहर ।
चिरनेर कातळकडा येथे उभारण्यात आलेल्या दत्त मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा मंगळवार पासून सुरू झाला आहे. दि. 19 डिसेंबर पर्यंत या सोहळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात होम-हवन, कळस रोहण व दत्त मूर्तींची प्रतिष्ठापना कळस रोहन, दत्तगुरूंच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना, दत्तगुरुंच्या जन्म सोहळ्याचा कार्यक्रम व श्री सत्यनारायणाच्या पूजेचे आयोजन करण्यात आले आहे.