मुरुड एकदरा गावात रामनवमी

| मुरुड | वार्ताहर ।
मुरुड एकदरा गावाचे धनुर्धारी मंडळ आयोजित रामनामवमीनिमित्ये राम जन्मकाळ गेली 58 वर्ष मोठ्या उत्साहात साजरा करतात. गावकरी सर्व हेवेदावे विसरून सकाळपासून रामाच्या मंदिरात जमतात. सकाळी उपाध्ये बुवांचे कीर्तन सुरु होते. यावेळी दोन हजार गावकरी व मुरुडकर जन्मकालसाठी देवळात सहभागी होतात. मोठ्या जल्लोषात रामजन्माचा उल्लेख होताच दोन हजार गावकरी राम मूर्तीवर फुले उडून राम जन्मकाळ साजरा करतात. सायंकाळी गावकरी रामायण व महाभारत कथेचे देखावे साकारतात. गावकरी विविध रूपे साकारून भव्य मिरवणूक काढतात, ती मिरवणूक मुरुड बाजारात येते व बाजाराच्या नाक्यावर हजारो मुरुडकरांच्या साक्षीने शौर्याचे खेळ दानपट्टा, तलवार बाजी, कुस्ती, उंचवूडी सदर होते. हि शुर्याची परंपरा एकदारच्या गावकर्यांनी 58 वर्ष सुरु ठेवली आहे.

Exit mobile version