। महाड । वार्ताहर ।
महाड तालुक्यात मुस्लिम धर्मियांचा पवित्र आणि महत्त्वाचा सण साजरा केला जातो. त्यानिमित्ताने रमजान ईदही मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरी केली जाते.
रमजान ईदमध्ये 30 दिवस मुस्लीम बांधव हे उपवास करतात. त्यामध्ये कुटुंबातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या पवित्र्य महिन्यात उपवास करून अल्लाहकडे प्रार्थना करतात. रमजान ईदनिमित्त शिरखुर्मा, बिर्याणी अशी मेजवानी असून त्याचा आनंद सर्व मुस्लीम बांधव घेतात. अशाचप्रकारे महाड तालुक्यात रमजान ईद मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. ईदनिमित्त महाडमधील जामा मस्जिद येथे सकाळी 8 वाजता नमाज अदा केल्यानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रत्येक मुस्लिम बांधवांच्या चेहऱ्यावर सणाचा आनंद दिसून येत होता.