| बीड | प्रतिनिधी |
संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराड आणि आरोपी सुदर्शन घुले यांना बीड जिल्हा कारागृहात मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी (दि.31) सकाळी तुरुंगात नेहमीप्रमाणे बंदी उठवण्यात आली होती. सकाळी नाश्ताच्या वेळी बंदी उठवल्याने सर्व कैदी बाहेर मोकळे होते. त्यावेळी महादेव गिते आणि अक्षय आठवले हे दोघेजण वाल्मिक कराड याच्या अंगावर धावून गेले. तेव्हा बाजुलाच असणारा सुदर्शन घुले वाल्मिक कराडच्या मदतीसाठी धावून आला. मात्र, महादेव गिते आणि अक्षय आठवले या दोघांनी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला चोपल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बीडच्या तुरूगांत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मकोका अंतर्गत शिक्षा भोगत असलेल्या वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला तुरूंगात मारहाण करण्यात आली. महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांच्याकडून वाल्मिक कराडला मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे. वाल्मिक कराडने एका केसमध्ये अडकवल्याचा राग मारहाण करणाऱ्यांना होता. म्हणून वाल्मिक कराडला तुरूंगात असताना बेदम मारहाण करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. इतकंच नाहीतर तर आठवड्यापासून बीड तुरुंगात शिक्षा भोगत असेलेल्या आरोपी महादेव गित्ते, अक्षय आठवले आणि वाल्मिक कराड यांच्या गँगमध्ये तणावाचे वातावरण होते अशी माहिती देखील मिळतेय. दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मिक कराड याच्यासह इतर आरोपी मकोका अंतर्गत बीड तुरूंगात आहेत. वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले बीडमधील तुरुंगात ज्या बॅरेकमध्ये आहेत. त्याच्या बाजूच्या बॅरेकमध्ये अक्षय आठवले आणि परळीतील महादेव गीते हा आरोपी शिक्षा भोगत आहेत. यांच्यात काहीतरी बाचाबाची झाली असून, या बाचाबाचीचे रूपांतर मारहाणीत झाल्याची माहिती मिळत आहे.