| महाड | प्रतिनिधी |
महाड तालुक्यातील बिरवाडी- ढालकाठी या गावातून एक अल्पवयीन मुलगा बेपत्ता झाला आहे. घरातून कोणाला न सांगता निघून गेला अथवा अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरण केले अशी तक्रार त्याच्या पालकांनी केली आहे.
महाड तालुक्यातील बिरवाडी या गावालगत असलेल्या ढालकाठी या गावातील आदित्य रोहित पारसे (16) हा आज सोमवार (दि.31) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घरातून निघून गेला अथवा कोणतरी अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरण केले अशी तक्रार महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्याची आई ऋतुजा रोहित पारसे (38) हिने आज केली आहे. याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.