। कोर्लई । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यातील वाणदे येथील रामचंद्र भिकू पाटील हे मुंबईच्या शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयातील मानक विभागात सहाय्यक मानक पदावर उत्तम प्रकारे सेवा करुन नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांचा मुंबईच्या शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय द्वारा कला, क्रीडा व साहित्य मंडळाने तसेच वाणदे ग्रामस्थांच्यावतीने सन्मान करण्यात आला.
शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयात सप्टेंबर 1987 ते सप्टेंबर 1989मध्ये मोनो कास्टिंग विभागात दोन वर्षे शिकाऊ उमेदवार नंतर दोन वर्षे हंगामी सेवा केली.दि.25 फेब्रुवारी 1991 रोजी मोनो कास्टिंग मशीन ऑपरेटर म्हणून सेवेत रुजू झाले.याच दरम्यान जुळणी विभाग कालबाह्य झाल्याने सन.2001 मध्ये मानक विभागात डिपार्टर म्हणून काम केले नंतर 2008 ते 2011 तीन वर्षे मुद्रितशोधन विभागात काम करुन मानक विभागात सहाय्यक मानक पदावर सेवा करुन नुकतेच सेवानिवृत्त झाले.
त्यांचा मुंबईतील कला क्रीडा व साहित्य मंडळातर्फे कार्याध्यक्ष प्रकाश कोरगावकर व चिटणीस नंदकिशोर मिराशी मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन तसेच वाणदे ग्रामस्थांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात येऊन पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी वाणदे गाव अध्यक्ष तुकाराम पाटील, सुरेश दिवेकर अशोक नाक्ती, श्रीकांत वारगे, प्रदीप दिवेकर, लक्ष्मण वारगे तसेच मुंबई मंडळाचे प्रकाश भायदे, गणपत पाटील, नरेंद्र भोईर, सुजित वारगे, महेश दिवेकर, दामोदर पाटील, गोविंद भोईर, ऋषिकेश बैकर व ग्रामस्थ उपस्थित होते.