। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील वरसोली – विजय नगर येथील मुरलीधर आनंदा कांबळे यांचे मंगळवारी(दि.11) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. निधनासमयी ते 85 वर्षाचे होते. वृत्तपत्राचे छायाचित्रकार रमेश कांबळे यांचे वडील होतं.
मुरलीधर कांबळे यांचा स्वभाव मनमिळावू होता. ते स्पष्ट वक्ते होते. मंगळवारी सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास त्यांचे राहत्या घरातच निधन झाले. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बुरूमखान येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप नाईक, लायन्स क्लबचे सभासद महेंद्र पाटील यांच्यासह राजकिय, सामाजिक शैक्षणिक वकील, पत्रकारिता अशा अनेक क्षेत्रातील मंडळींनी उपस्थित राहून त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. मुरलीधर कांबळे यांची शोकसभा आणि पुण्यनुमोदन विधी त्यांच्या राहत्या घरी गुरुवारी (दि. 13) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास झाली. बौध्दाचार्य परशुराम ओव्हाळ यांच्या मार्फत ही विधी पार पडली.







