रमेश नाईक सावतामाळीचे चेअरमन

जगदीश कवळे व्हा.चेअरमन
| अलिबाग | प्रतिनिधी |
सावतामाळी नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी नाईक यांची फेरनिवड तर व्हाईस चेअरमनपदी जगदीश कवळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पतसंस्थेच्या संचालक मंडळाची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली होती.त्यानंतर झालेल्या पहिल्याच बैठकीत अध्यासी अधिकारी तथा प्राधिकृत अधिकारी अशोक मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

चेअरमपदासाठी रमेश नाईक आणि व्हा.चेअरमनपदी जगदीश चव्हाण यांचेच अर्ज झाल्याने या दोन्ही निवडी बिनविरोध करण्यात आल्या.या निवडीबद्दल मोरे यांनी उभयतांचे अभिनंदन केले.उपस्थित संचालकांनीही नाईक,कवळे यांना शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version