रामकुमार गुप्ता उत्तरकाशीत बेपत्ता

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील डीकसळ येथील ‌‘पूजा स्वीट्स‌’चे मालक सुमित गुप्ता यांचे वडील रामकुमार हनुमान गुप्ता (65) हे उत्तरकाशी येथील गंगोत्री-गोमुख परिसरात देवदर्शनासाठी गेले असता बेपत्ता झाले आहेत. 25 सप्टेंबर रोजी गंगोत्री-गोमुख ट्रेक मार्गावरील चिरबासाच्या पुढे ‌‘कच्छिधांग‌’ परिसरात ते सुमारे 130 मीटर खोल दरीत पडल्याची माहिती आहे. रामकुमार गुप्ता हे पाच जणांच्या गटासोबत गोमुखच्या दिशेने जात होते. बेपत्ता गुप्तांचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफ, नेपाळी जवान, वनविभाग आणि पोलिसांचे मिळून 18 जणांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून शोधमोहीम सुरू आहे. मात्र, सततचा पाऊस आणि खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. हवामानात सुधारणा झाल्यानंतर शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. सध्या गुप्ता यांचा कोणताही मागमूस लागलेला नाही.

Exit mobile version