रणबीर-आलियाची लगीनघाई!

। मुंबई । वृत्तसंस्था ।
बॉलिवूडमधील सतत चर्चेत असणारी रणबीर आणि आलियाची जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. या दोघांनीही त्यांच्या लग्नाबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिली नसली तरीही त्यांच्या लग्नाच्या तयारीचा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून येत्या १३ ते १७ एप्रिल या कालावधीत ते दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. मुंबईतील चेंबूर इथल्या आर.के.बंगल्यावर ही तयारी सुरु असून अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत ते लग्न करणार आहेत अशी चर्चा सुरु आहे.

Exit mobile version