राजकोट किल्ल्यावर तुफान राडा

राणे आणि ठाकरे आमने-सामने

। सिंधुदुर्ग । प्रतिनिधी ।

सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीने बुधवारी (दि. 21) मोर्चाची घोषणा केली असून आदित्य ठाकरेही दाखल झाले होते तर, दुसरीकडे नारायण राणेसुद्धा पाहणीसाठी पोहोचले होते. याचवेळी दोन्ही कार्यकर्ते आमने-सामने आले. त्यानंतर कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. पोलिसांनी यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणत दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना रोखले. मात्र काही वेळाने बघता बघता शाब्दिक चकमक थेट धक्काबुक्की आणि हाणामारीपर्यंत जाऊन पोहचली.

Exit mobile version