राणेंची जुनी प्रकरणे ओपन होणार

शिवसेनेचा गर्भित इशारा
मुंबई | प्रतिनिधी |
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी संबंधित जुन्या फाईल नव्याने ओपन होण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि राणे यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. त्याचा दुसरा अंक आता सुरू होण्याची चिन्हे आहेत.
राणे यांच्या जुन्या फाईल्स ओपन होण्याची चिन्हे आहेत. तसे संकेत सामना ये सेनेच्या मुखपत्रातून दिले आहेत. जामिनावर सुटल्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेनेसोबत पुन्हा संघर्ष करण्याचे संकेत दिले आहेत.
राणे यांच्या भूमिकेबाबत पक्षश्रेष्ठी काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे. शिवाय राणे आक्रमक झाले तर त्यांचा अडचणीत आणणार्‍या कोकणातील काही संशयास्पद गोष्टी बाहेर काढण्याची चिन्हे आहेत. शिवसेना राणेंविरोधात दुसरा डाव टाकण्याची शक्यता आहे. सामनाच्या अग्रलेखातून तसे संकेत दिले आहेत. तेथील हत्या आणि बेपत्ता प्रकरणातील जुन्या फाइल ठाकरे सरकार पुन्हा उघडण्याची तयारी करत आहे का? असा प्रश्‍न आजच्या अग्रलेखामुळे समोर येतो. राणे यांना पुन्हा अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न असू शकतो.

Exit mobile version