महिलांच्या शक्ती-तुरा नाचांनी आणली रंगत

। खांब-रोहे । वार्ताहर ।
रोहे तालुक्यातील देवकान्हे येथे झालेल्या महिलांच्या शक्ती-तुरा नाचांनी चांगलीच रंगत आणून रसिक प्रेक्षकांचेही चांगलेच मनोरंजन झाले.
देवकान्हे येथील गावदेवी मंदिराचे प्रांगणात नवरात्रौत्सवानिमित्त देवीच्या उत्सवासाठी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते राजेश सुटे व रोठ बु.येथील ज्ञानेश्‍वर साळुंखे यांनी पुरस्क्रुत केलेल्या व ग्रामस्थ मंडळ व तरूण मंडळ देवकान्हे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शक्ती-तुरा नाचाचे सामन्याप्रसंगी बाबूराव बामणे,राजेश सुटे,प्रकाश कान्हेकर,विठ्ठल बामुगडे, भिकू सुटे,संतोष कोंडे,विजय कान्हेकर, बाळू आगळे,संतोष ग.कोंडे,विजय कान्हेकर,सुधाकर जवरत,प्रदीप जवरत,अनिल सुटे,हरिश्‍चंद्र टिकोणे, वसंत बामुगडे, एकनाथ मोहिते,मारूती कान्हेकर, चंद्रकांत बामुगडे, जितेंद्र कान्हेकर, शंकर बामुगडे, हिराजी घरट,अनिल सुटे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version