| उरण | प्रतिनिधी |
दुर्गराज किल्ले रायगडावरील पवित्र सदरेवर महाआरोग्य शिबीर, आरोग्य विषयी जनजागृती आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून सामाजिक कार्य करणाऱ्या मंगेश चिवटे, बाजीराव चव्हाण यांना शिवरत्न पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. त्याचबरोबर मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे, बाजीराव चव्हाण, प्रवीण पाटील, सुनील क्षीरसागर, सुनील जगदाळे, मिलिंद मोरे, नितिन गोरडे, तेजस भोईर, विजय कदम, सुधीर जगदाळे, संतोष साबळे आणि वनिता साबळे यांना ‘ शिवरत्न’ म्हणून पावन सदरेवर सन्मानित केले गेले. नवीन वर्षाची सुरुवात रायगडावरील महाराजांच्या समाधीला जलाभिषेक घालून पूजन करून करण्यात आली. तिथे निमंत्रित केलेल्या मान्यवरांचा सन्मान करून गडदर्शन आणि गडाची स्वच्छता करण्यात आली. कार्यक्रमाला कृष्णाजी पाटील, विजय शहा, रंगराव खिलारे, नूतन खिलारे उपस्थित होते.
रायगड येथे रंगला शिवरत्न पुरस्कार सोहळा
