। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल शहरातील अनेक वर्षांपासून सामाजिक व धार्मिक कायातर्र् अग्रेसर असणार्या लाईन आळी येथील शिवशक्ती मित्र मंडळाने होळी व रंगपंचमी उत्सव विविध सांस्कृतिक व धाार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात आला.
रमेश गुडेकर यांच्यासह गौरव वेदक, संदीप पाटील, खंडेश धनावडे, समीर कदम, प्रकाश वाघे, प्रवीण पोवार, प्रशांत नरसाळे, अरुण ठाकूर, संतोष तळेकर व अनिकेत जाधव आदींसह मंडळातील सदस्यांनी रंगपंचमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्तााने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षिस समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.