म्हसळ्यात रंगपंचमी उत्साहात

| म्हसळा | वार्ताहर |

सालाबादप्रमाणे याही वर्षी म्हसळा शहरामध्ये रंगपंचमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. रंगपंचमीच्या उत्सवात छोट्या-छोट्या बच्चे कंपनीच्या चेहर्‍यावरील आनंद ओसंडून वाहत होता. दरवर्षी म्हसळा कुंभार समाजाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने लहान मुलांतून राधा-कृष्ण, सुदामा, पेंद्या अशा प्रकारच्या भूमिका बजावणारी मुलं नटूनथटून बैलगाडीमध्ये रथ तयार करून त्यांची संपूर्ण शहरभरातून मिरवणूक काढण्यात आली. शेवटी हा रथ धावीर देव विराजमान झालेल्या ठिकाणी होळीच्या पटांगणात विसर्जित करण्यात आला.

Exit mobile version