रणजी क्रिकेट करंडक स्पर्धेची बाद फेरी

मुंबई-बडोदा उपांत्यपूर्व फेरीत लढत

| मुंबई | वृत्तसंस्था |

यंदाचा रणजी क्रिकेट करंडकाचा मोसम आता अंतिम टप्प्यात पोहोचत आहे. साखळी फेरीचा थरार सोमवारी आटोपल्यामुळे आता बाद फेरीला सुरुवात होणार आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतींना 23 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारे आठही संघ निश्चित झाले असून सर्वाधिक 41 वेळा विजेतेपद पटकावलेल्या मुंबईच्या संघासमोर बडोद्याचे आव्हान असणार आहे.

मुंबईने यंदाच्या रणजी मोसमातील साखळी फेरीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सात सामन्यांमधून पाच लढतींमध्ये विजय मिळवताना ब गटामध्ये 37 गुणांसह अव्वल स्थान पटकावत बाद फेरीत प्रवेश केला आहे. मुंबईने 2015-16 मध्ये अखेरचे रणजी विजेतेपद पटकावले आहे. आता आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा या बलाढ्य संघाला विजेतेपदाची आशा बाळगता येणार आहे. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या बॅटमधून धावा निघत नसल्या तरी भूपेन लालवानी, पृथ्वी शॉ, तनुष कोटियन यांची दमदार फलंदाजी व शिवम दुबे, शम्स मुलानी यांची अष्टपैलू चमक आणि मोहित अवस्थी, रॉयस्टन डियास यांची प्रभावी गोलंदाजी मुंबईच्या दिमतीला आहे. त्यामुळे मुंबईचा विजेतेपदाचा दुष्काळ यंदा संपण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, बडोद्याने ङ्गडफ गटातून 24 गुणांसह दुसरे स्थान मिळवत बाद फेरीत प्रवेश केला आहे.

Exit mobile version