। पोलादपूर । वार्ताहर ।
स्वप्नातील गाव स्पर्धेत पोलादपूर तालुक्यातील रानवडी बुद्रुक आणि देवपूरवाडी ही गावे स्वदेस फाऊंडेशनतर्फे स्वप्नातील गावे घोषित करण्यात आली. स्वदेस फाऊंडेशनचे महाप्रबंधक तुषार इनामदार यांनी दोन्ही गावांमध्ये जाऊन ग्रामसुधार कमिटीला या स्वप्नातील गाव निवडीचे पत्रक प्रदान केले. यावेळी रानवडी बुद्रुक या गावाने तंटामुक्ती, निर्मलग्राम, वनग्राम तसेच अन्य पारितोषिके पुरस्कार प्राप्त केल्याने आता स्वप्नातील गाव संकल्पनेद्वारे स्वदेस फाऊंडेशनच्या माध्यमातून या गावाने विकास साध्य करावा, असे मत चंद्रकांत कळंबे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमांस सुमन कुंभार, तुषार इनामदार, प्रभारी गटविकास अधिकारी हंबीर, वैद्यकीय अधिकारी डॉ.बागतकर, बोरावळे ग्रुपग्रामपंचायतीचे सरपंच वैभव चांदे, निवृत्ती उतेकर, पांडुरंग जाधव, प्रदीप साठे, कुमारी खेडेकर, सुजल अहिरे, कृउबाचे संचालक लक्ष्मण मोरे, तलाठी वैराळे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.