रेवदंड्यातील कॉटेजमध्ये बलात्कार; एकावर गुन्हा दाखल

| रेवदंडा | प्रतिनिधी |

इन्स्टाग्रामवर ओळखीतून महाड बिरवाडीतील युवक व युवतीचे प्रेमसंबंध निर्माण झाले, या प्रेमसंबधातून लग्नाचे आमिष दाखवून रेवदंडा येथील कॉटेजमध्ये बलात्कार केल्याची तक्रार युवतीने केली आहे. याबाबत रेवदंडा पोलिसांचा तपास सुरू आहे.

महाड बिरवाडी येथील 23 वर्षीय युवकाने दि. 28 नोव्हेंबर 2022 रेोजी इन्स्टाग्रामवर ओळख निर्माण होऊन प्रेमसंबंधातून इर्टिका कार नंबर एम/14 डी.टी. 8949 ने रेवदंडा येथील कॉटेजवर आणून तिचे इच्छेविरूध्द शारीरिक संभोग केला. त्यानंतर या युवकाने  वेळोवेळी लग्नाचे आमिष देऊन महाबळेश्वर येथील एका हॉटेलमध्ये व माणगावमधील आनंद भवन लॉज रूममध्ये शारीरिक संबंध केले. त्यानंतर तिच्याशी अचानक बोलणे बंद करून लग्न करण्यास नकार देत फसवणूक केली, अशी तक्रार पीडित युवतीने महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात केली आहे.

दरम्यान, ही तक्रार रेवदंडा पोलिस ठाण्यास प्राप्त झाल्याने रेवदंडा पोलिसांनी महाड बिरवाडी येथील गणेश नगरमधील 23 वर्षीय युवकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास रेवदंडा पोलीस ठाण्याचे इन्चार्ज सहा. पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे करीत आहेत.

Exit mobile version