तरुणावर गुन्हा दाखल
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील हुमगांव येथील विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून अनेकवेळा बलात्कार केला. तर दुसरीकडे त्या विवाहित महिला नवर्यापासून घटस्फोट घेण्यास भाग पडणार्या त्या तरुणाने विवाहितेला दोनदा गर्भपात करण्यास भाग पाडले आहे. त्यांनतर लग्नाचे आमिष न पाळणार्या त्या विवाहितेची फसवणूक करीत राहिला. त्यामुळे बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा कर्जत तालुक्यातील सालवड येथील 23 वर्षीय तरुणावर दाखल झाला असून त्या तरुणाला मदत करणारा त्याच गावातील आणखी एका तरुणाला या गुन्ह्यात आरोपी बनविले आहे.
कर्जत तालुक्यातील हुमगांव येथील ही घटना असून कर्जतचे पोलीस उपाधीक्षक विजय लगारे यांनी घटनास्थळी भेट दिली असून कर्जत पोलीस ठाण्याच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक या प्रकाराचा अधिक तपास करीत आहेत. कर्जत पोलीस ठाण्यात 28 वर्षीय विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यावर अनेकवेळा बलात्कार तसेच दोन वेळा गर्भपात आणि नंतर फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. कर्जत तालुक्यातील सालवड येथील 23 वर्षीय तरुणाला या प्रकरणात मदत करणारा त्याचा त्याच गावातील मित्र असलेल्या तरुणावर देखील गुन्हा दाखल झाला आहे. कर्जत पोलीस ठाण्यात 1/2022 खाली भादवी कलम 376, 420, 34 खाली गुन्हा दाखल आहे .