आरोपीस 10 वर्षे सश्रम कारावास
| पनवेल | प्रतिनिधी |
आरोपी लिंगाप्पा मल्लया पुजारी हा अल्पवयीन पिडीत मुलीच्या शेजारी राहत होता. सदर पिडीता अल्पवयीन व मतीमंद असल्याची आरोपीस माहिती होती. असे असताना पिडीत मुलगी पातळगंगा नदीवरून कपडे धुवुन घरी परत येत असतांना आरोपी-लिंगाप्पा मल्लया पुजारी यांने अल्पवयीन पिडीत मुलीला त्याचे ताब्यातील दुचाकीवर जबरदस्तीने बसवून आय ओ.सी कंपनीच्या मागे असलेल्या झाडी झुडपात नेवून तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
सदर प्रकार पिडीतेच्या आईला समजल्यानंतर पिडीतेच्या आईने तात्काळ सदर तक्रार दाखल केली. त्यानंतर तक्रार व पिडीता यांचे जबाब नोंदविण्यात आले तसेच सदर घटनेचा वेळी हजर असणाऱ्या महिलांचे देखील लेखी जबाब नोंदविण्यात आले. त्यामुळे आरोपीविरुद्ध खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर तपासाअंती सदर गुन्ह्याचे कामी दोषारोपपत्र मे. न्यायालयात सादर करण्यात आले आणि पनवेल येथील विशेष पोक्सो न्यायालयात सदर खटल्याची सुनावणी पूर्ण झाली. याकामी सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकील, प्रतिक्षा बडे वारंगे यांनी काम पाहिले. सरकारपक्षातर्फे 10 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पिडीता, पिडीतेची आई. शेजारील महिला यांची साक्ष तसेच तपासिक अधिकारी ए.पी. आय. कल्याणी पाडोळे यांची साक्ष महत्वाची ठरली. तसेच कोर्ट पैरवी म.पो.शि. वंदना राठोड आणि पो.शि. 999 स्वप्निल पानसरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर खटल्याचेकामी विशेष सरकारी वकील, प्रतिक्षा वडे वारंगे यांनी न्यायालयासमोर केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून मा. न्यायालयाने आरोपी लिंगप्पा मल्लया पुजारी, याला भारतीत दंड संहितेनुसार 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व एकूण रक्कम रु. 1,00,000/- दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. सदर खटल्याच्या निकालाकडे पनवेल आणि खोपोली परिसरातील लोकांचे लक्ष लागून राहिलेले होते.







