लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

। अलिबाग । वार्ताहर ।
सध्याच्या काळात महिला संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महिलांवरील अत्याचार, महिलांची फसवणूक असे गुन्हे समाजात वाढत चालले आहेत. अशीच घटना अलिबाग तालुक्यातील पिडीत महिलेसोबत घडली. पनवेल मधील डेरवली येथे राहणार्‍या आरोपीने दि.30 नोव्हेंबर 2017 पासून ते 30 ऑक्टोबर 2021 पर्यंत अलिबाग तालुक्यातील फणसापूर येथे राहणार्‍या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर पाच वर्ष बलात्कार केला. पिडीत महिलेच्या इच्छेविरूद्ध आरोपीने प्रथम महिलेला हॉटेल अनिशा लॅाजींग नागाव येथे नेऊन तिचे शारिरिक शोषण केले. त्याचबरोबर पवित्र निवास, डेरीवली, पनवेल व सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन पिडीतेचे शारिरिक शोषण केल्याची पिडीत महिलेने तक्रार नोंदविली आहे. सातत्याने होणार्‍या शोषणाबाबत पिडीतेने अलिबाग पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version