| ठाणे | वृत्तसंस्था |
ही घटना 25 ऑगस्ट रोजी घडलेली आहे. भिवंडी शहरातील न्यू आझाद नगर भागातील एका चाळीत राहणाऱ्या 28 वर्षीय नराधमाने शेजारील 13 वर्षीय मुलीसोबत मैत्री केली. नंतर तिच्या असहाय्यतेचा फायदा घेतला. पीडितेचे आई वडील कामाला गेल्यावर तिच्यावर गेल्या सहा महिन्यात वेळोवेळी अत्याचार केले होते.अल्पवयीन पीडित मुलीने नकार दिल्यानंतर नराधमाने तिला मारहाण केली. यामुळे भयभीत पिडीतेने आईकडे या बाबत सांगितल्यानंतर पालकांनी मुलीसह शांतीनगर पोलिस ठाणे येथे तक्रार केली.
रफिक शेख (28) असं त्या आरोपीचं नाव असून गेल्या सहा महिन्यांपासून तो अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत असल्याचं उघडकीस आलं आहे. पोलिसांनी तातडीने नराधम रफिक शेख यास ताब्यात घेत त्यावर गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली आहे. आरोपीला भिवंडी न्यायालयात मंगळवारी (दि.27) हजर केले असता 2 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.







