संतापजनक! 10 वर्षांच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार

आरोपींमध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश

। हरियाणा । वृत्तसंस्था ।
हरियाणाच्या रेवाडीमध्ये देशाला हादरवून टाकणारी घटना घडल्याचे समोर आले आहे. अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकलीवर तब्बल सात जणांनी सामूहिक बलात्कार केल्याी धक्कादायक घटना घडली. उल्लेखनीय म्हणजे, या सात आरोपींमध्ये केवळ एक आरोपी सज्ञान (18 वर्षांचा) असून इतर सर्व आरोपी अल्पवयीन आहेत. यामध्ये 10 आणि 12 वर्षांच्या मुलांचाही समावेश आहे. इतकंच नाही तर या आरोपींनी बलात्काराचा व्हिडिओही काढला होता.

24 मे रोजी काही मुलं खेळता खेळता जवळच असलेल्या एका शाळेच्या इमारतीत गेले. करोना संसर्गकाळात शाळा सुरु नसल्याने ही इमारत रिकामी होती. त्याठिकाणी सात मुलांनी एका 10 वर्षांच्या मुलीवर शारीरिक अत्याचार केले. परंतु, ही घटना तब्बल आठवड्याभरानंतर उघडकीस आली. सामूहिक बलात्काराच्या घटनेचा आरोपींनी काढलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना समोर आली. पीडित मुलीच्या शेजारी राहणार्‍या रहिवाशांच्या निदर्शनास हा व्हिडिओ आला होता. त्यानंतर त्यांनी पीडित मुलीच्या कुटुंबाला याबद्दल माहिती दिली. त्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबाने 9 जून रोजी पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केली.


रेवाडीचे पोलीस उपअधीक्षक हंसराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील अत्यंत गांभीर्याची बाब म्हणजे, आरोपींमध्ये केवळ एक आरोपी सज्ञान आहे. या आरोपीचं वय 18 वर्ष आहे. तर इतर सर्व आरोपींची वय 10 – 12 वर्ष आहे. पीडित मुलीच्या शेजार्‍यानं व्हिडिओच्या आधारे आरोपींना ओळखले आहे. हा व्हिडिओ व्हायरल करणार्‍याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

Exit mobile version