नागशेत कबड्डी स्पर्धेत रासळ विजयी

| पाली/गोमाशी | प्रतिनिधी |

ग्रामस्थ मंडळ नागशेत व श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ ठाणे, मुबंई उपनगर यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सुधागड तालुका स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे भव्य दिव्य आयोजन गुरुवारी (दि.19) नागशेत येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत तालुक्यातील नामवंत 16 संघानी आपला प्रवेश नोंदविला होता. या कबड्डी स्पर्धेसाठी क्रीडाप्रेमीनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या स्पर्धेचे देखणे नियोजन तसेच युट्यूब माध्यमातून थेट प्रक्षेपनाची सोय या मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. या स्पर्धेतील अंतिम लढत रासळ विरुद्ध नेणवली या संघात झाली. स्पर्धेच्या अंतिम लढतीत रासळ हा संघ विजयी झाला. या संघास रोख रक्कम 15 हजार व आकर्षक चषक तर द्वितीय क्रमांक नेणवली या संघास 11 हजार व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक चिवे तर चतुर्थ क्रमांक नांदगाव या संघांना प्रत्येकी 7 हजार व आकर्षक चषक देऊन मंडळच्या वतीने गौरविण्यात आले.या स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ करजाई हा ठरला.या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू पार्थ शिर्के, सर्वोत्कृष्ट चढाई अमर ठाकूर, उत्कृष्ट पक्कड रोहित शेडगे, पब्लिक हिरो राकेश खैरे या सर्व खेळाडूंना मंडळाच्या वतीने आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version