| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील आक्षी ग्रामपंचायतीच्या सरपंच रश्मी रविंद्र पाटील यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त झाला आहे. ग्रामविकास क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र ग्रामविकास परिषदेतर्फे पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली होती. आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आक्षी गावाच्या सरपंच रश्मी पाटील या राजकीय, सामाजिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. राजकीय क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. आक्षी ग्रामपंचायत हद्दीतील गावे, वाड्यांचा विकास साधण्याबरोबरच वेगवेगळ्या योजना पोहचविण्यासाठी त्या कार्य तत्पर राहिल्या आहेत. त्यामुळे ग्राम विकास क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल पुणे येथील महाराष्ट्र ग्राम विकास परिषदेने घेऊन त्यांची आदर्श सरपंच म्हणून निवड केली. हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यावेळी त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.






