रेशन दुकानदारांचे कमिशन रखडले

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल तालुक्यातील 199 दुकानदारांपैकी 120 दुकानदारांचे कमिशन रखडले आहे. याबाबत रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ रॉकेल विक्रेते असोसिएशनने पुरवठा विभागाच्या उपायुक्तांना पत्र लिहून कमिशन वितरित करण्याची मागणी केली आहे. जून 2025 पासून हे कमिशन दिलेले नाही. तालुक्यातील 53 रास्त भाव धान्य दुकानदारांचे अद्ययावत प्रणालीद्वारे रजिस्ट्रेशन प्रलंबित असून, 26 दुकानदारांची माहिती प्राप्त नाही. याबाबत निर्णय घेण्याची विनंती अध्यक्ष भरत पाटील यांनी पत्राद्वारे केले आहे.

Exit mobile version