पनवेलमध्ये ‘बिंदास छमछम’! तोकडे कपडे, अश्लील नृत्य; 9 जणांविरोधात गुन्हा

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल तालुक्यातील कोन येथील बिंदास बारमध्ये ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली लेडीज बार चालत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पनवेल तालुका पेालिसांनी बारचे व्यवस्थापकासह 9 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

कोन येथील बिंदार बारमध्ये पोलिसांनी सोमवारी (दि.1) अचानक छापेमारी केली. त्यावेळी तोकडे कपडे घालून अश्लील हावभाव करत ग्राहकांसमोर बारबालांचा नाच सुरु होता. या छापेमारीत पोलिसांनी 9 जणांना ताब्यात घेतले. तोकडे कपडे घालून अश्लील नाच करत होत्या. पनवेल परिसरातील लेडीज बारमुळे पनवेलचे नाव यापूर्वीच बदनाम झाले आहे. क्रेझी बॉईज बारमध्ये प्रेम संबंधातून दोन महिन्यांपूर्वी गोळीबाराची घटना देखील उघडकीस आली होती. अनेकदा पोलिसांच्या कारवाया होत असल्या तरीदेखील बार चालक-मालक घाबरत नसल्याचे दिसत आहे. यापुर्वी बारचे परवाने रद्द करूनही अनेकदा त्या ठिकाणी अश्लीलता पहावयास मिळते. नवीन वर्षाच्या पहिल्याच रात्री पनवेल तालुका पोलिसांनी बिंदास बार अँड ऑर्केस्ट्रावर कारवाई केली. हॉटेल बिंदास बार अँड ऑर्केस्ट्रा येथे ग्राहकांच्या मनोरंजनाकरता आयोजित केलेल्या ऑर्केस्ट्रात अश्लीलता सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकत बारचे व्यवस्थापक प्रदीप कुमार नायर यांच्यासह 9 जणांना ताब्यात घेतले.

बारमध्ये बारचे चालक-मालक, कर्मचारी आणि ग्राहकांकडून त्या बारबालांना अश्लील नृत्य करण्यास संगनमताने प्रोत्साहित केल्याप्रकरणी, तसेच ऑर्केस्ट्रा बारमध्ये नाचण्यास प्रतिबंध असल्याने पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version